शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 16 मे 2020 (14:12 IST)

लॉकडाउन संपल्यावर कोरोनाच्या समूह संसर्गचा धोका; तज्ज्ञाचा इशारा

भारताने कोरोनाच समूह संसर्गासाठी (कम्युनिटी ट्रान्समिशन ) तयार राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यकत केले आहे. भारतामध्ये लॉकडाउन शिथिल करण्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करताना कोरोनाचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने होईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
 
काही तज्ज्ञांनी भारतामध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे मत व्यक्त केले आहे. पब्लिक हेल्थ फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी हे समूह संसर्गाची व्याख्या काय आहे त्यावर भारतात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे की नाही हे सांगता येईल असे म्हटले आहे. रेड्डी यांनी यासंदर्भात बोलताना, भारतामध्ये आता असे अनेक रुग्ण आहेत जे परदेशात जाऊन आलेले नाहीत किंवा जे थेट कोणत्याही कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात आले नाहीत तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे सांगितले.